📌 इंडिया पोस्ट GDS भरती २०२६ - ठळक मुद्दे
- एकूण जागा: देशभरात तब्बल २३,७५७ ग्रॅमीण डाक सेवक (GDS) पदांची मेगाभरती.
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण, संगणकाचे व सायकल चालवण्याचे मूलभूत ज्ञान आवश्यक.
- वयोमर्यादा: २१ सप्टेंबर २०२६ रोजी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे (मागासवर्गीयांसाठी नियमानुसार सवलत).
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (राज्यनिहाय व मंडलनिहाय रिक्त जागा).
१. भारतीय डाक विभाग भरती संक्षिप्त माहिती
शेतकरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे. भारतीय डाक विभागाने (India Post) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांच्या तब्बल २३,७५७ रिक्त जागांसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. १० वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.
२. अर्ज करण्याची महत्त्वाची वेळापत्रक (Important Dates)
| तपशील | कालावधी / तारीख |
|---|---|
| ऑनलाइन एक-वेळ नोंदणी (One-Time Registration) | ३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर २०२६ |
| ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत | ०२ ते २१ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत) |
| अर्ज दुरुस्ती (Edit Window) कालावधी | २३ ते २४ सप्टेंबर २०२६ |
३. अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा
- अर्ज शुल्क (Fee): जनरल, OBC आणि EWS प्रवर्गासाठी ₹१००/- फी आहे. तर SC, ST, PWD, ट्रान्सवुमन आणि सर्व महिला उमेदवारांसाठी फी पूर्णपणे माफ (मोफत) आहे.
- वयाची अट: २१ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
- वयोमर्यादा सवलत: नियमानुसार SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
💡 महत्त्वाचा सल्ला:
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रे (१० वीचे गुणपत्रक, आधार कार्ड, फोटो आणि सही) तयार ठेवावीत. अंतिम मुदतीची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज नोंदणी पूर्ण करावी.
📲 सरकारी नोकरीच्या अपडेट्स आणि रोजचे बाजारभाव थेट व्हॉट्सॲपवर मिळवा!
शासकीय योजना, भरती आणि कृषी अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी आमचे व्हॉट्सॲप चॅनेल फॉलो करा.
👉 व्हॉट्सॲप चॅनेल जॉईन करा